वर्धा : पक्षफुटीचा हंगाम सध्या जोरात सुरू आहे. मग निष्ठा तपासणी आलीच. प्रश्न राष्ट्रवादीचा असल्याने थोरले की धाकटे पवार हवेत, अशी थेट विचारणा हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात सुरू झाली. शरद पवार समर्थक प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले यांनी त्यासाठी चक्क मेळावाच घेतला. पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले. त्यांच्याकडून शरद पवारांना समर्थन असल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एवढेच नव्हे तर त्याची नोटरीच्या साक्षीने कायदेशीर नोंदही झाली. प्रलय तेलंग, डॉ. सुरेखा देशमुख, प्रशांत घवघवे, जावेद मिर्झा, बालाजी गहलोत, सुजाता जांभूळकर, निता गजबे, सीमा तिवारी, मीनाक्षी धाकने, सुचिता सातपुते, अर्चना नांदुरकर, भारती घुंगरूड, दिपाली रंगारी, माधवी देशमुख, आदी पदाधिकारी प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात अग्रेसर होते. इथले बहुतांश पदाधिकारी शरद पवार समर्थक आहे, असे यावरून स्पष्ट होत असल्याचे वांदिले म्हणाले.