लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा: मलकापूर शहर परिसरातील मातोश्री जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीला आज अचानक आग लागली. यामुळे सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी शेकडो क्विंटल कापूस खाक झाला. अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/06/cotton-fire-buldhana-1.mp4
व्हिडीओ- लोकसत्ता टीम

ही आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. अचानक लागलेल्या आगीत फॅक्टरी परिसरात असलेल्या कापसाच्या गंजीनी पेट घेतला. कामगारांनी आगीवर नियंत्रणाचा प्रयत्न केला. मात्र आगीने उग्र स्वरूप धारण केला. याची माहिती कळताच मलकापूर नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सतत केलेल्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. या अग्नितांडवात शेकडो क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. तसेच साहित्य व उपकरणांची मोठी हानी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.