प्रशांत देशमुख, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना थेट संबोधण्यासाठी “मन की बात” हा उपक्रम सुरू केला. येत्या रविवारी त्याचा शंभरावा भाग सादर होईल. विशेष प्रयोजन खास पद्धतीने साजरा करण्याच्या भाजपा परंपरेतून या उपक्रमास पण साज लाभणार आहे.

भाजपाध्यक्ष नड्डा यांच्या सूचना काय?

भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मंगळवारी सायंकाळी व्ही.सी.च्या माध्यमातून खासदारांना त्याची माहिती देताना नमूद केले की, हा भाग मोदी सरकारने केलेली विकास कामे व अमलबजावणीची माहिती तसेच प्रस्तावित योजनांची माहिती देणारा असेल. त्याची अधिकाधिक लोकांना माहिती व्हावी म्हणून प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी केली. प्राप्त माहितीनुसार, प्रत्येक आमदारास त्यांच्या क्षेत्रातील शंभर बूथवर या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी किमान शंभर नागरिक उपस्थित असलेच पाहिजे. प्रक्षेपण टी. व्ही., एल.सी.डी. व अन्य माध्यमातून झाले पाहिजे. अकरा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमापूर्वी भजन, भाषण, रांगोळी स्पर्धा किंवा तत्सम कार्यक्रम घेणे अपेक्षित आहे. खासदारांना त्यांच्या मतदारसंघांपैकी कुठेही एका ठिकाणी उपस्थित राहून प्रक्षेपण करण्यात येईल त्यावेळी हजर राहणे अपेक्षित आहे. मात्र इथे किमान एक हजार लोकांची उपस्थिती अनिवार्य आहे. उपस्थित लोकांसाठी उदबोधनात्मक कार्यक्रम ठेवण्याची सूचना आहे.

काय आहे खास आठवण?

विशेष म्हणजे, याच कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी हे शंभर रुपयाच्या नाण्याचे लोकार्पण एक खास आठवण म्हणून करणार आहेत. संघटन मंत्री अविनाश देव म्हणाले की, कार्यक्रम प्रसारणापूर्वी विविध कार्यक्रम घेण्याची मुभा आहे. या कार्यक्रमाचा तपशील व छायाचित्रे पक्षाच्या संकेतस्थळावर टाकने अनिवार्य करण्यात आले आहे.