चंद्रपूर : व्याघ्र संंशोधनाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात ४४६ वाघ आहेत आणि यातील ९० टक्के वाघ विदर्भातील व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य, संवर्धन राखीव क्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्रात आहे. यातील ७० टक्के वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. यामुळे देशभरातील व्याघ्र शिकाऱ्यांच्या टोळीची चंद्रपूर जिल्ह्यावर वक्रदृष्टी आहे. बावरिया व बहेलिया शिकारी टोळींनीदेखील या जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देशात वाघांची संख्या चंद्रपूर जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. त्यासोबतच जिल्ह्यात वाघांची जिवंत विद्युत प्रवाह सोडून शिकार, नैसर्गिक मृत्यू तथा जंगलात जाळ लावून शिकार केल्याच्या घटनादेखील तपासातून समोर येत आहेत. या शिकाऱ्यांच्या टोळ्या जंगलाच्या शेजारीच वास्तव्य करून असतात. जंगलालगतच्या गावांमध्ये या शिकारी टोळ्यांचे म्होरके सातत्याने फिरतीवर असतात, अशी माहिती समोर आली आहे. वाघांवर विषप्रयोगदेखील या टोळ्यांनी यापूर्वी केले आहे.

हेही वाचा – अमृत भारत स्थानक! आज पायाभरणी प्रसंगी होणार जल्लोष

हेही वाचा – पश्चिम विदर्भात शिवसेना ठाकरे गटाला धक्का? अकोल्यातील मोठा गट शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात

नागपूर व लगतच्या छत्तीसगड तथा तेलंगाणामार्गे या टोळ्या रेल्वे तथा खासगी वाहनांच्या माध्यमातून चंद्रपुरात दाखल होतात. वाघांचा सर्वाधिक वावर असलेल्या जंगल परिसरावर या टोळ्या लक्ष ठेवून असतात.