भंडारा : प्रेम संबंधातून गर्भवती झालेल्या व पंधरवड्यापूर्वी लग्न होऊन सासरी आलेल्या एका विवाहितेचा सासरच्यांनी गर्भपात करून अर्भक जंगलात पुरल्याची धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यातील चिचाळ येथे घडली. पीडितेच्या तक्रारीवरून पती, सासू- सासरे यासह अन्य ७ जणांविरोधात दिघोरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. निखिल विलास रंगारी (२७) असे पतीचे नाव असून, सासरे विलास शंकर रंगारी (५५), सासू देवला विलास रंगारी (४८) यांच्यासह लीना रंगारी (३४), अक्षय खोब्रागडे (२२), मोहित शेंडे (२५), लक्ष्मण जांगळे (३८), अंकित रंगारी (३२), सर्व रा. चिचाळ व साकोली येथील दोन अनोळखी महिला-पुरुषांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : रानटी हत्ती पहायला जाणे पडले महागात ; खड्ड्यात पडल्याने पायाचे हाड मोडले

पोलीस सूत्रानुसार, पीडितेचे गेल्या एक वर्षापासून निखिलशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून पीडित ६ महिन्याची गर्भवती झाली. दोघांनीही मागील १४ ऑगस्ट रोजी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाहानंतर सासरच्यांनी पिडीतेचा नियमित छळ करीत गर्भधारणेवर संशय व्यक्त केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सासरच्यांनी २ व ३ सप्टेंबर रोजी पीडितेला गर्भपाताचे औषध दिले. औषधाच्या सेवनाने पीडितेला अस्वस्थ वाटू लागले. संध्याकाळच्या सुमारास उपचाराच्या बहाण्याने साकोली येथे नेवून २ अनोळखी महिला-पुरुष व घटनेतील आरोपींच्या साह्याने गर्भपात करून जंगलात अर्भक पुराल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे. घटनेचा पुढील तपास दिघोरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार करीत आहेत

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband aborted his wife buried the infant the forest crime against mother in law father in law7 others bhandara tmb 01