गोंदिया : कौटुंबिक वादातून पती व सासूने गर्भवती सूनेचा छळ केला. त्यामुळे प्रसुती होऊन नवजात बाळ दगावल्याची घटना घडली. याबाबत महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून तिरोडा पोलिसांनी पती व सासूवर गुन्हा दाखल केला आहे. तिरोडा तालुक्यातील येडामाकोट येथे सावन सुनील मुटकुरे (वय २८) ही गर्भवती असताना २५ ऑगस्ट रोजी पती सुनिल मुटकुरे व सासू हिरामोती मुटकुरे यांनी तू घरचे काम करत नाही, आपल्या वडीलांना पैसे देते व इतर घाणेरडे आरोप करून शारीरिक व मानसिक छळ केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सततच्या भांडणामुळे पीडित महिला घर सोडून जाण्यास निघाली. तेव्हा तिच्या सासूने काठीने पाठ, पाय व मानेवर मारले. तसेच पती सुनिल यानेसुद्धा तिच्या मानेवर थापड व पाठीवर बुक्की मारली. या मारहाणीमुळे गर्भवती महिलेला त्रास सुरू झाला. त्यामुळे तिच्या पतीने मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. नंतर पुढील उपचारासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी महिलेची परिस्थीत बघून लवकर प्रसुती होऊ शकते, असे सांगितले. त्यामुळे पती सुनिल याने गोंदिया येथे बाई गंगाबाई महीला रुग्णालय मध्ये भरती केले.

हेही वाचा >>> नागपूर : प्रेयसीला मारहाण करणाऱ्या पतीचा प्रियकराने केला खून

२६ ऑगस्ट रोजी प्रसुती होऊन बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत पीडित महिला सावन मुटकुरे हिला गर्भवती असताना सासू व पतीने मारहाण केल्यामुळे तिचे बाळ दगावले असे पोलिसांना सांगितले. त्यावरून तिरोडा पोलिसांनी सासू व पतीवर गुन्हा दाखल केला आहे. तिरोडा पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून आम्ही गंगाबाई रुग्णालयातील तिची प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांच्या वैद्यकिय अहवालाची प्रतीक्षा करीत आहोत. त्यात दगावलेले बाळ तिला पती आणि सासूने केलेल्या मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाल्यास तिच्या पती आणि सासूला अटक करणार असल्याची माहिती तिरोडा चे पोलीस निरीक्षक देविदास कठाले यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband and mother in law violently beat pregnant woman a newborn baby died sar 75 ysh
Show comments