पत्नीच्या खोलीत प्रियकराला रंगेहात पकडल्यानंतर पती व त्याच्या दोन साथिदारांनी युवकाचा खून केला. ही थरारक घटना मंगळवारी पहाटे इमामवाडा परीसरात घडली. नितीन सोहनलाल रोहनबाग (३८, गंगाबाई घाट) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. गब्बर ऊर्फ राजेश चव्हाण, बाबल्या झांझोटे आणि अनिकेत झांझोटे अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गब्बर चव्हाण हा शासकीय रुग्णालयात नोकरीवर आहे. त्याला दोन बायका असून दोघींकडून दोन दोन मुले आहेत. पहिल्या पत्नीच्या चोरून त्याने नात्यातील तरुणीशी लग्न केले होते.
हेही वाचा >>> १९ लाख ८० हजार रूपयांचे अमली पदार्थ जप्त
नितीन रोहनबाग गब्बरचा मित्र आहे. त्यामुळे त्याचे घरी येणे-जाणे होते. गेल्या काही दिवसांपासून गब्बर आणि त्याची पत्नी यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. दरम्यान, नितीन आणि गब्बरच्या दुसऱ्या पत्नीचे सूत जुळले. पतीशी वाद झाल्यामुळे तो गेल्या १५ दिवसांपासून पहिल्या पत्नीच्या खोलीवर राहायला गेला होता. यादरम्यान, त्याच्या पत्नीचे नितीनसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. काही दिवसांपासून नितीन आणि ती महिला खुलेआम घरी भेटायला लागले. रात्रीच्या सुमारास दोघेही संबंध ठेवत होते. दोघांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण गब्बरला लागली. त्याने गेल्या दोन दिवसांपूर्वी पत्नीच्या खोलीवर पाळत ठेवली. मध्यरात्रीच्या सुमारास नितीन पत्नीचा खोलीवर येत होता आणि पहाटेच्या सुमारात परत जात होता.