नागपूर : परपुरुषासोबत पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दोघे पती-पत्नी मोंढा परिसरातील एका कंपनीत रोजंदारीने कामावर होते. त्या ठिकाणीच असलेल्या पर्यवेक्षकाशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्या महिलेमध्ये आणि त्या पर्यवेक्षकात प्रेमसंबंध निर्माण झाल्याची माहिती तिच्या पतीला  मिळाली. त्याने अनेकदा पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकायला तयार नव्हती. २० डिसेंबरला दुपारी तो घरी आला असता पत्नी त्या पर्यवेक्षकासोबत आक्षेपार्ह स्थितीत सापडली. त्यावेळी तिघांमध्ये जोरदार भांडण झाले. भांडणानंतर पती घराबाहेर निघून गेला व वेणा नदीच्या काठावरील एका झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.