नागपूर : पतीची गुन्हेगारांशी संगत असल्याने पत्नी माहेरी गेली. तिच्या विरहात पत्नीच्या मैत्रिणीच्या मोबाईलवर मॅसेज पाठवून पतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ऋतिक ठवरे (२२, मिसाळ लेआऊट, जरीपटका) असे मृत युवकाचे नाव आहे.

ऋतिक ठवरे हा युवक गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याची काही गुन्हेगारांशी मैत्री होती. काही गुन्ह्यात सहभागी असल्यामुळे त्याला पोलिसांनी एका वर्षांपूर्वी तडीपार केले होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्याची तडीपारी संपली आणि तो परत नागपुरात आला. त्याचे जया नावाच्या एका युवतीशी प्रेमसंबंध होते. मात्र, ऋतिकची गुन्हेगारांशी मैत्री तिला आवडत नव्हती. त्यामुळे ती वारंवार गुन्हेगारी प्रवृत्ती सोडण्यासाठी तगादा लावत होती. शेवटी त्याने गुन्हेगारी वृत्ती सोडण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे जयाने ऋतिकशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर महिन्यात दोघांनी प्रेमविवाह केला. त्यांचा संसार सुरू होता. यादरम्यान त्याचे काही मित्र त्याला भेटायला येत होते. त्यामुळे ती नाराज होती. याच गोष्टीवरून दोघांमध्ये १८ फेब्रुवारीला वाद झाला. ऋतिकने जयाच्या कानशिलात मारली. त्यामुळे पत्नीने रागाच्या भरात थेट माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ऋतिकला पत्नीच्या कानशिलात मारल्याचा पश्चाताप झाला. त्याने पत्नीला फोन केला. ती फोन उचलत नव्हती. शेवटी त्याने तिच्या मोबाईलवर अनेक संदेश पाठवले.

Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
Gym trainer ends life over dispute with boyfriend send video to mother don't leave him shocking Photo
PHOTO: सॉरी मम्मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला सोडू नको” आईला शेवटचा मॅसेज करुन संपवलं आयुष्य
emboldened rioters attacked police officer in nashik
पतीचा पत्नी, मेहुणी, सासऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला
Golden fox dead in Kharghar, Golden fox, Kharghar,
खारघरमध्ये सुवर्ण कोल्हा मृतावस्थेत

हेही वाचा – नागपूर: संजय राऊत यांच्यात हिमंत असेल तर त्यांनी ‘त्या’ एजंटचे नाव सांगावे,बच्चू कडू यांचे आव्हान

हेही वाचा – बुलढाणा: शेतकऱ्यांवरील लाठीमार षडयंत्रच ! मला संपविण्याची सुपारी देण्यात आली; रविकांत तुपकर यांचा गंभीर आरोप

‘जया…मला भेटायला यायचे आहे, मला माफ कर’ असे संदेश पाठवूनही पत्नी त्याला प्रतिसाद देत नव्हती. ऋतिकच्या वारंवार फोन आणि संदेश पाठविण्यामुळे तिने त्याचा नंबर ‘ब्लॉक’ केला. त्यामुळे तो नैराश्यात गेला. पत्नी फोन उचलत नसल्याने त्याने पत्नीच्या मैत्रिणीच्या मोबाईलवर संदेश पाठवला. ‘जया मी जात आहे…माल माफ कर, माझ्या आईला माफ कर’ असा संदेश मैत्रिणीला मिळताच तिने जयाला फोन करून माहिती दिली. तोपर्यंत ऋतिकने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.