नागपूर : भेटायला घरी आलेल्या पत्नीच्या मैत्रिणीशी पतीची नजरानजर झाली. समीर आणि संजना (बदललेले नाव) यांचा प्रेमविवाह झाला. लग्नाला दहा वर्षे झाली. त्यांना एक मुलगा आणि मुलगी असा सुखी संसार. समीर हा घर बांधकाम ठेकेदार आहे. संजना गृहिणी आहे. एके दिवशी संजना ही मुलांना घेऊन उद्यानात गेली असता तेथे वर्गमैत्रिण काजल (बदललेने नाव) ही तिच्या मुलांसह भेटली.

तिने वस्तीतच राहत असल्याचे सांगितले. दोघींच्या गप्पा-टप्पा झाल्या. एकमेकींना मोबाईल क्रमांक देऊन दोघीही घराकडे निघाल्या. एका रविवारी संजनाने मैत्रिण काजलला घरी चहा-नाश्ता करायला बोलावले. काजल घरी आल्यानंतर संजनानाने तिची पतीसोबत ओळख करुन दिली. त्यावेळी काजल आणि समीरची नजरा-नजर झाली. काही दिवसांत पुन्हा काजल मैत्रिणीला भेटायला घरी आली. त्यावेळी समीरने तिचा मोबाईल क्रमांक घेतला. काही दिवसांनी तिच्याशी संपर्क केला आणि दोघांची मैत्री झाली. ती वारंवार मैत्रिणीला भेटायला घरी यायला लागली. यादरम्यान काजल आणि समीर यांचे सूत जुळले. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांच्या वारंवार भेटी होऊ लागल्या. दोघांचेही वर्षभरापासून प्रेमसंबंध सुरु होते.

National Commission for Indian System of Medicine allows direct doctor admission after 10th standard
आता दहावीनंतरच डॉक्टर होता येणार! जाणून घ्या सविस्तर…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
eknath shinde devendra fadnavis (1)
महायुतीची सत्ता आल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? शिवसेना नेत्यांची मोर्चेबांधणी; भाजपाचाही पाठिंबा?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Prakash Ambedkar on government formation
Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Sanjay Raut on Mahavikas Aghadi
Sanjay Raut : “आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी…”, संजय राऊतांचा गंभीर दावा; म्हणाले…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!

हेही वाचा…आता दहावीनंतरच डॉक्टर होता येणार! जाणून घ्या सविस्तर…

काजलच्या घरी भेटायला गेलेल्या संजनाला काही वस्तूंवर संशय आला. काजलच्या काही साड्या, नेकलेस, घरातील शोभेच्या वस्तू संजनाकडेसुद्धा सारख्याच होत्या. मात्र, योगायोग असल्याचे समजून तिने दुर्लक्ष केले. मात्र, दिवाळीच्या आदल्या दिवशी कामावर जात असल्याचे सांगून पती घराबाहेर पडला.दरम्यान, संजना खरेदीसाठी बाहेर पडली. काजलच्या घरासमोर पतीची गाडी उभी दिसल्याने तिला संशय आला. तिने काजलचा दरवाजा ठोठावला. घरात पती आणि संजना गप्पा करताना दिसून आले. पत्नीला बघून पती आणि काजल दोघेही घाबरले. दोघांनीही प्रेमसंबंधाची कबुली देऊन चूक मान्य केली. अशा प्रकारे दोघांच्या प्रेमसंबंधाचे बिंग फुटले.

दोघेही पहिल्या भेटीतच एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, दोघांच्याही प्रेमसंबंधाचे बिंग फुटले आणि संसार मोडकळीस आला.भरोसा सेलने पती-पत्नी व मैत्रिणीच्या नात्यातील नाजूक गुंता सोडवले. मैत्रिणीने दाम्पत्याच्या संसारातून काढता पाय घेतला. त्यामुळे पोलिसांच्या हस्तक्षेपाने पुन्हा एका दाम्पत्याचे मनोमिलन झाले.

हेही वाचा…दरात चढ उतार; सोयाबीन हमीभावापेक्षा कमीच…

भरोसा सेलची मध्यस्थी

दिवाळीच्या दिवशी संजना मुलांना घेऊन भरोसा सेलमध्ये आली. तिची तक्रार पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांनी ऐकून घेतली. त्याच दिवशी पती आणि काजलसुद्धा बोलावून घेतले. समूपदेशक समिधा इंगळे यांनी समीर आणि संजनाचे समूपदेशन केले. काजलनेही स्वतःचा संसार आणि मैत्रिणीचा संसार वाचविण्यासाठी संजनाची माफी मागितली. समीरनेही काजलशी असलेले सर्व संबंध तोडून टाकण्याचे आश्वासन दिले. समीर हा पत्नी व मुलांसह दुसऱ्या वस्तीतील घरात राहण्यास निघून गेला. अशा प्रकारे तुटलेला संसार पुन्हा एकदा जोडण्यास भरोसा सेलने महत्वाची भूमिका निभावली.