भंडारा : कौटुंबिक कलहातून पतीनेच पत्नीचा गळा चिरून हत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार महिला दिनी घडला.शहरातील रामकृष्ण नगरात शनिवारी ८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास हा थरार घडला. कुंदा भूपेंद्र पाहुणे (२५) असे जखमी पत्नीचे नाव आहे. आरोपी पती भूपेंद्र (मुन्ना) गणेश पाहुणे (२५, रामकृष्ण नगर, संताजी सभागृह) यास तुमसर पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गंभीर जखमी झालेल्या पत्नीला उपचारार्थ उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी आरोपी भूपेंद्र याचा पत्नीशी शाब्दिक वाद घडला. वाद विकोपा गेला आणि रागाच्या भरात भूपेंद्रने स्वयंपाक घरातील सुरीने चक्क पत्नीचा गळा चिरला.

त्यात तिने स्वतःला कसेबसे सावरत रक्ताच्या थारोळ्यात बाहेर निघून शेजाऱ्यांनी मदतीसाठी हाक मारली. त्यातून सदर घटना उघडकीस आली. तुमसर पोलिसांना सूचना करून स्थानिकांनी लगेच जखमीला उपचारार्थ हलविले. वैद्यकीय माहितीनुसार महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असून रक्तस्राव झाल्याने तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

महिला दिनाला गालबोट

एकीकडे सुरक्षा तथा सशक्तीकरणातून महिला सन्मानाची जाणीव समाजात रुजवली जात आहे. त्यात चक्क महिला दिनीच पतीने राग अनावर होत पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना महिला दिनाला गालबोट लावणारी ठरली आहे. घटनेवरून परिसरात एकच संताप व्यक्त केला जात असून स्वतःच्या घरातही आता महिला