वर्धा : नेहमी होणारा वाद विकोपास गेला अन् संतप्त पती राजेशसिंग राजगत्ता याने पत्नी मंगला हिचा दगडाने डोके ठेचून निर्घृण खून केला. ते पुलगाव येथील दगडी फैलात भाड्याच्या घरात राहतात. या पती पत्नीत मजुरीच्या पैशातून नेहमी वाद होत असे. तसेच भांडणे पण होत होती.
हेही वाचा – यवतमाळ : जिल्ह्यात दीड हजारांवर दुर्गादेवींची स्थापना
हेही वाचा – गोंदिया : कॉलम व पाया शिवाय भिंतीचे बांधकाम; कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
अन्य कारणांनी त्यात भरच पडत असे. घटनेच्या दिवशी वाद विकोपास गेला तेव्हा पतीने खूनच करून टाकला. पत्नी मंगला घराच्या दारात रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. हे पाहणारा शेजारी राहूल चानपुरकर याने पोलिसांना माहिती दिली. तेव्हा आरोपीला अटक करण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.