नागपूर : पत्नीने आंघोळ करण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीला जबर मारहाण केली. तिचे डोके भींतीवर आपटून तिचा खून केला. ही घटना सावली-मावली गावात घडली. रुख्मिणी गणेश घोडेस्वार (४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणेश घोडेस्वार (४५) हा पत्नी रुख्मिनी व दोन मुलींसह सावली गावात राहत होता. तो एका कंपनीत कामाला होता. त्याने दोन वर्षांपूर्वी नोकरी सोडली आणि तेव्हापासून घरीच होता. तो पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. तसेच तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. तसेच तिला वस्तीत कुणाशीही बोलू देत नव्हता.

हेही वाचा – चंद्रपूर : महर्षी कर्वे महिला ज्ञानसंकुलाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण – सुधीर मुनगंटीवार

पत्नीचे कुणाशीतरी अनैतिक संबंध आहेत, असा संशय तो नेहमी घेत होता. याच कारणावरून तो पत्नीला नेहमी मारहाण करायचा. त्याच्या मारहाणीमुळे रुख्मिणी त्रस्त झाली होती. शुक्रवारी रात्री आठ वाजता पत्नीला आंघोळ करण्यास सांगितली होते. मात्र, पत्नीने तब्येत बरी नसल्यामुळे आंघोळ करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने तिला केस पकडून जबर मारहाण केली. तिचे डोके भींतीवर आदळून तिचा खून केला. सकाळी मुलगी भूमिका हिने शेजाऱ्यांना माहिती दिली. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी गणेश घोडेस्वार याला अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband murder wife in savli mavli village adk 83 ssb