अकोला: उत्तर पश्चिम रेल्वे झोनमध्ये ‘यार्ड रिमॉडलिंग’ तांत्रिक कामे करण्यासाठी काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये अकोला मार्गे धावणारी हैदराबाद – जयपूर एक्सप्रेसच्या एकूण आठ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे आहेत. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच अडचण होणार आहे.
हैदराबाद-जयपूर एक्सप्रेस अकोलामार्गे धावते. गाडी क्रमांक १२७२० हैदराबाद -जयपुर एक्सप्रेसची २७, २९ नोव्हेंबर, ०४ आणि ०६ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक १२७१९ जयपुर – हैदराबाद एक्सप्रेसच्या २९ नोव्हेंबर, ०१, ०६ आणि ०८ डिसेंबर रोजीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ऐन गर्दीच्या हंगामात हैदराबाद – जयपूर गाडीच्या आठ फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडणार आहे.