अकोला : सणासुदीच्या काळातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता भोपाळ येथील ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे हैदराबाद-जयपूर एक्सप्रेस पूर्वनियोजित वेळेनुसार धावेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – शेतकरी विधवासाठी ‘हॅशटॅग तेरवं’ चळवळीचे लाँचिंग १७ ला

हेही वाचा – महिलांनी तोकडे कपडे घालणे अश्लीलता नाही, उच्च न्यायालय असे का म्हणाले?

भोपाळ रेल्वे विभागातील बुधनी-बरखेडा तिसरा मार्ग टाकण्याच्या कामासाठी ‘नॉन इंटरलॉकिंग’ कामासाठी ‘ब्लॉक’ लागू करण्यात आला होता. आता त्याची तारीख वाढवण्यात आली आहे. या कारणास्तव रतलाम रेल्वे विभागाच्या ज्या गाड्या १४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत रद्द आणि वळवण्यात आल्या होत्या, त्या आता त्यांच्या नियमित वेळापत्रकानुसार धावतील. या रद्द झालेल्या गाड्यांमध्ये पूर्णा, अकोला, खंडवा, इटारसी मार्ग धावणारी गाडी क्र. १२७२० हैदराबाद-जयपूर एक्सप्रेस १६ ते २५ ऑक्टोबर व गाडी क्र. १२७१९ जयपूर-हैदराबाद एक्सप्रेस १८ ते २७ ऑक्टोबरदरम्यान पूर्वनियोजित वेळेवर धावणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyderabad jaipur express will run as scheduled bhopal block canceled due to festival ppd 88 ssb
Show comments