अकोला : हैदराबाद ते जयपूरदरम्यान अकोला-वाशीम मार्गे धावणाऱ्या हैदराबाद-जयपूर-हैदराबाद विशेष गाडीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने आठवड्यातून एकदा चालविण्यात येणाऱ्या या गाडीला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – विदेशात संशोधन कार्यासाठी मिळणार शिष्यवृत्ती, ‘‘या” योजनेस मुदतवाढ
दक्षिण मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनूसार, गाडी क्रमांक ०७११५ हैदराबाद-जयपूर साप्ताहिक विशेष गाडी ७ जुलै ते २५ ऑगस्ट या कालावधित दर शुक्रवारी प्रस्थान स्थानकावरून रवाना होणार आहे. ही गाडी दर शनिवारी सकाळी ५:४० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. या गाडीच्या आठ फेऱ्या होणार आहेत.