नागपूर : लहानपणी अतिशय खोडकर, एकमेकांच्या खोड्या करणारा, घरात बहीण भावासोबत मस्ती करणारा आणि तितकाच शांत आणि संवेदनशील मनाचा माझा भाऊ देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.त्यामुळे त्याची मोठी बहीण म्हणून खूप आनंद आहे. पूर्वी जसा आम्हाला वेळ देत होता तसा आता परिवाराला वेळ देत नसला तरी कुठलाही पारिवारिक कार्यक्रम असला की आम्ही त्याला बोलवत असतो आणि राजकारण सोडून अन्य विषयावर गप्पा मारतो.देवेंद्र फडणवीस यांची मोठी बहीण स्वाती फडणवीस साठे बोलत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा शपथ घेत असताना त्यांची पांडे ले आऊट येथे राहणारी मोठी बहीण स्वाती फडणवीस -साठे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, २०१४ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला त्यावेळी आम्ही सर्व मुंबईला शपथविधी सोहळ्याला गेलो होता. त्यावेळी त्याने एक दिवस परिवारासाठी ठेवला होता. पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना मोठी बहीण म्हणून मला खूप आनंद आहे.

हेही वाचा…वर्धा : ‘ब्रेकी थेरेपी’ काय आहे? असह्य वेदना आणि जटील व्याधी…

माझ्यापेक्षा तो तीन वर्षानी लहान आहे. रक्षाबंधन असो भाऊबीज असो तो हमखास वेळ मिळेल तसा नागपूरला येत असतो. विशेषत: दिवाळीला भाऊबीज किंवा पाडव्याला फडणवीस कुटुंब एकत्र येत असताना त्यावेळी त्याला औक्षवण करत असतो. त्यावेळी अनेक लोक त्याला भेटायला येत असतात मात्र आजचा दिवस केवळ कुटुंबासाठी म्हणून तो फारसा कोणाला भेट नाही. राजकारण सोडून तो आमच्यासोबत गप्पा मारतो. वेगवेगळे किस्से सांगत असतो. खूप मजा करत असतो. सगळ्या लाडक्या बहिणीने त्याला मत दिले आहे,

त्यामुळे आमच्यासह राज्यातील सगळ्या बहिणी आनंदात आहे, सुरुवातीपासून तो मेहनती आहे. अभ्यासात हुशार आहे. त्यामुळे त्याची मेहनत सार्थकी लागली आहे. देवेंद्र वडिलांना खूप घाबरत होता. त्यांना कुठलीही गोष्ट सांगितल्याशिवाय तो करत नव्हता. त्याचा स्वभाव आनंदी आणि कधीही त्याच्या चेहऱ्यावर तणाव दिसत नाही. २०१४ नंतर नंतर त्याला कुटुंबियांसाठी नक्कीच वेळ कमी पडतो. पहिले तो कार्यकर्ता म्हणून समाजासाठी काम करतो आणि त्यानंतर मात्र कुटुंब त्याच्यासाठी असल्यामुळे वेळ मिळेल तेव्हा तो आमच्याशी गप्पा मारतो आणि घरी येतो.

हेही वाचा…Devendra Fadnavis 3.0: “लहानपणी देवेंद्र बॅटिंग करायचा आणि फिल्डिंग आली की…”, फडणवीसांबद्दल बालपणीच्या मित्रांनी जागवल्या आठवणी!

विशेषत: राखी आणि भाऊबीज या निमित्ताने आमची भेट होते पण कधीतरी त्याला निवांत असेल तो आम्हाला बोलावतो. भाऊ बहीण एकत्र जमलो की तो गमती स्वभावाचा असल्यामुळे मजेशीर घटनाचे अनेक किस्से त्यामुळे सगळे कुटुंब आम्ही हासत असतो. तसा तर तो अनेकदा बिनधास्त राहत होता. महाविद्यालयात शिकत असताना कधीही मित्रासोबत घरी न सांगता निघून जात होता मग कुठे गेला अशी त्याच्या मित्रांना विचारपूस केली तर बाहेरगावी गेल्याचे सांगत होते. एक दिवस तर मित्राना घेऊन तर अयोध्येला गेला होता. त्यानंतर जम्मु काश्मीरला आंदोलन सुरू असताना गेला होता. तेथे गेल्यावर गेल्यानंतर तो फोन करुन सांगत होता मी या ठिकाणी आहे. लहानपणापासून खोडकरपणा स्वभाव असलेला देवेंद्र परिवारात असला की आजही तसाच असतो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am happy to be devendra fadnavis s elder sister as he becomes chief minister again vmb 67 sud 02