लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती : बाबरी मशीद ज्या वेळी पडली, त्या वेळी मी तेथेच होतो. याचा मला अभिमान आहे. १८ दिवस बदायूंच्या तुरूंगात देखील होतो. लाठ्याही खाल्ल्या, गोळ्याही बघितल्या, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केला.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मालखेड मार्गावर १११ फूट उंच हनुमानाची मूर्ती उभारण्याचा संकल्प केला आहे. या मूर्तीची उभारणी सध्या सुरू आहे. या स्थळी पूजा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अयोध्येत कारसेवेसाठी गेलेल्या कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.
आणखी वाचा-नागपुरात काय घडले? पोलीस म्हणतात अफवांवर विश्वास ठेवू नका
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज भारताची नवीन अस्मिता सुरू झाली आहे. आता भारतीय संस्कृती जगामध्ये सर्वमान्य होणार आहे. भारतीय विचारपद्धती जग स्वीकारणार आहे. आता भारत हा सर्वप्रकारच्या गुलामगिरीतून बाहेर आलेला आहे, गुलामाचे प्रतीक संपलेले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान झाले आहेत. नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अकरा लाख लाडूंचा प्रसाद प्रभू श्रीरामललांच्या आगमनाच्या निमित्ताने आयोजित केला. त्यासाठी आपल्याला आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांना निमंत्रित केले, त्याचा आपल्याला आनंद आहे.
आणखी वाचा-करोनाच्या नावावर मागितला ‘पॅरोल’, न्यायालय म्हणाले, ‘आता कुठाय करोना…?
ते पुढे म्हणाले, पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर आपले आराध्य दैवत प्रभू श्रीरामलला त्यांच्याच जागेत पुन्हा विराजमान झाले आहेत. हा पाचशे वर्षांचा संघर्ष होता, ज्यामध्ये लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. पण, आज ज्या कारसेवकांनी तो कलंकाचा ढाचा खाली आणून मंदिराच्या निर्मितीत योगदान दिले, त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. हे सर्व कारसेवक म्हणजे श्रीरामाचे हनुमानच आहेत, जे रामकार्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. मला अतिशय अभिमान आहे, की दोन्ही कारसेवेच्या वेळी मी त्या ठिकाणी होतो.