नागपूर: मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक-दीड वर्षांपासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा. माझ्यासमोर वरळीतून लढावे अन्यथा मी त्यांच्याविरुद्ध ठाण्यातून लढायला तयार आहे, असे थेट आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – कांदा, इथेनॉल प्रश्नावर अमित शहांची भेट लांबणीवर; अजित पवार म्हणाले…

हेही वाचा – केंद्र सरकारकडून राज्याला दुय्यम स्थान, शेतकरी प्रश्नांवर अंबादास दानवे आक्रमक

बोरवली-विरार या रेल्वेसाठी काही कांदळवन हलवायचा प्रयत्न होत आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची मला माहिती मिळाली. विशेष म्हणजे हे कांदळवन गडचिरोलीला हलविणार असल्याची माहिती आहे. हे तर जखम मांडीला आणि मलम शेंडीला, असा टोला त्यांनी लगावला. धारावी विकासाच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, धारावीच्या विकासावर सरकारचे नियंत्रण असायला हवे. सरकारच्या कुठल्यातरी मित्राचा विकास होऊ नये. जनतेचा विकास व्हायला हवा. ज्या प्रकारच्या सवलती आपण त्यांना देतोय ते पाहता सरकारने हा प्रकल्प पूर्ण करावा.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am ready to fight against the cm from thane aditya thackeray challenges eknath shinde in vidhan bhavan premises in nagpur mnb 82 ssb