नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री म्हणून मी देशातील अपघात अपेक्षेनुसार कमी करू शकलो नाही. या गोष्टीचे मला दु:ख आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘मनातले शल्य’ व्यक्त केले.
जी. एच. रायसोनी मेमोरियल टाॅक अंतर्गत अभिनेता अनुपम खेर यांनी शनिवारी नागपुरात घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. गडकरी पुढे म्हणाले, देशात वर्षाला पाच लाख अपघात होतात. त्यात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. मी अनेक चांगले काम केले, मात्र अपेक्षेनुसार अपघात कमी करू शकलो नाही.
हेही वाचा… …अन् काही मिनिटातच ‘किंकाळ्या’ही थांबल्या! योगेशने सांगितला मृत्यूच्या तांडवाचा थरार…
अपघातात १८ ते ३४ वयोगटातील ६० टक्के तरुणांचा मृत्यू होतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे कायद्याचा ना कुणाला सन्मान आहे, ना भीती. आपल्या जीवनात पैसे कमावणे गुन्हा नाही. मात्र, जबाबदार संवेदनशील नागरिक होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे, असेही गडकरी म्हणाले.