गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार गटाने बोलावलेल्या बैठकीत अनुपस्थित असलेल्या त्या १२ आमदारावर कारवाई साठी नोटीस बजावली असून त्यात गोंदिया जिल्हा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार / प्रफुल पटेल गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती माध्यावर झळकत आहे. मात्र अश्या प्रकारची कोणतीही नोटीस शरद पवार गटातर्फे मला आलेली नाही आणि मला मिळाली नाही. तर अश्या या नोटिस बद्दल मला पण माध्यमांच्या कडून नुकतेच कळलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पण प्रत्यक्षात अशी कोणतीही नोटीस मला मिळाली नसून ती कोणत्या संदर्भात आहे. हे सुद्धा मला माहीत नसल्यामुळे मी त्यावर सध्या कोणतेही भाष्य करणार नसल्याचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी अर्जुनी मोरगाव येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात स्थानिक माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. ५ जुलै रोजी मुंबई येथे झालेल्या सभेत जे आमदार वाय. बी. सेंटर येथे उपस्थित झाले नव्हते अश्या पैकी १२ आमदारांना नोटिस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडून बजावण्यात आले आहे. अशी माहिती माध्यमातून समोर आली आहे.