नागपूर: नागपूर भाजप शहर कार्यकारिणीची सभा शुक्रवारी पार पडली. शिक्षक मतदारसंघात पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांचा पराभव कां झाला याचे मंथन या सभेत झाले. समारोपीय भाषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. निवडणुकी दरम्यान कोणी काम केले आणि कोणी नाही केले याकडे अप्रत्यक्षरित्या बोट दाखवताना त्यांनी कार्यकर्त्यांना मी गृहमंत्री आहे आणि मला सर्व ठाऊक आहे, हे सांगितले. त्यांच्या बोलण्याचा रोख कोणाकडे होता याबाबत आता नेते व कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> “निवडणूक आयोगाच्या निर्णयाने खरी शिवसेना स्पष्ट” देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले “सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे…”

फडणवीस म्हणाले , मी गृहमंत्री आहे. मला चांगलंच ठाऊक आहे की कोण काय काम करतं? माझं सगळ्यांकडे व्यवस्थित लक्ष आहे. काँग्रेस पक्ष नेत्यांचा पक्ष झाला आणि त्यानंतर कागदावरचा पक्ष झाला आहे. मला भीती आहे की नागपूरमध्ये भाजपाची हीच अवस्था होणार का? माझं व्यवस्थित सगळ्यांकडे लक्ष आहे. त्यामुळे कुणीही असं समजू नका मी लक्ष देत नाही. जे माजी आहेत त्यांना आजी नगरसेवक व्हायचं आहे. अनेकांचा व्यवहार मालक आहोत असा आहे. हे चालणार नाही. काही जण नेत्यांची माणसं आहेत. आपला स्वतःचा सवतासुभा आहे त्यांना पक्षाशी काही घेणंदेणं काही नाही. असं बिलकुल चालणार नाही हे लक्षात ठेवा