नागपूर : काँग्रेसमध्ये जात-पात कधी पाहिली जात नाही. परंतु, आमच्यातील काही स्वार्थी लोक विषारी प्रचार करत आहे. मी कधी जातीय द्वेष केला नाही. ज्या काही माझ्या विरोधात समाज माध्यमावर पोस्ट व्हायरल केल्या आहेत ते मला बदनाम करण्यासाठी असून त्यांची नावे लवकरच समोर आणणार असल्याचे मत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

विजय वडेट्टीवार नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. आमच्यातील पाच दहा लोकांचे टोळके हे धंदे करत असतात. बाळू धानोरकरला तिकीट कशी मिळवून दिली आहे हे सगळ्या लोकांना माहीत आहे. अडबाले याना उमेदवारी मिळणार नव्हती. ती मी मिळवून दिली. आता हेच लोक माझ्या विरोधात जातीय पोस्ट व्हायरल करत मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा…दिग्गजांना पराभूत करण्याचा नागपूरचा इतिहास

कुणबी समाजाच्या माझ्या संदर्भातील व्हायरल पोस्टबाबत समाजातील अनेक नेत्यांचे मला फोन आले. आमच्यातील एक टोळकं विषारी जातीय द्वेष पसरवत आहे. मी कुठल्याही समाजाचा द्वेष केलेला नाही. बहुजन समाजातील छोटा कार्यकर्ता आहे. असा जातीय द्वेष करून मोठा होता येत नाही. तिकीट कोणाला द्यायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा हायकमांडला आहे. मी माझ्या मुलीसाठी तिकीट मागितली, त्यात माझा काय दोष आहे. मी माझ्या मुलीसह अनेकांचे नाव सुचवले आहे. मात्र आमच्यातील काही लोक मला लक्ष्य करत आहे. उद्या रविवारपर्यंत विदर्भातील तिकीट वाटप जाहीर होईल. चंद्रपूरसाठी मला हायकमांडने विरोध केला नाही. मला पक्षाने आदेश दिला तर मी निवडणूक लढेल असेही वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा…व्हेज थाळी १०० तर नॉनव्हेज थाळी १५० रुपये… निवडणूक प्रचार व दर निश्चित

भाजप नेते आशीष देशमुख जी टीका करत आहे ते भाजपाच्या संस्कृतीमध्ये आहे. देशमुख २०१९ मध्ये कोणासाठी उमेदवारी मागण्यासाठी आले होते. याचे उत्तर जर त्यांनी दिले तर योग्य होईल असे मला वाटते असेही वडेट्टीवार म्हणाले.

Story img Loader