आयसीआयसीआय बँकेत खाते असलेल्या एका कंपनी मालकाच्या नावाने शाखा व्यवस्थापकाला फोन करून चार खात्यातील ४० लाख रुपये वळते करण्यास सांगितले. कंपनीच्या मालकाने तक्रार केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेककुमार चौधरी हे सेंट्रल बाजार रोडवरील आयसीआयसीआय बँकेत शाखा व्यवस्थापक आहेत. या बँकेत अँग्रो स्क्वेअर प्रा. लिमीटेड कंपनीचे मालक प्रकाश वाधवानी यांचे खाते आहे.

हेही वाचा : नागपूर : दारूच्या नशेत वकिलाचा धुडगूस ; पोलिसासह डॉक्टरला केली मारहाण

शाखा व्यवस्थापकांना २ सप्टेबरला कपनी मालकाच्या नावाने दुस-या व्यक्तीने फोन चार खात्यातील रक्कम वळती करण्यास सांगितले. बॅंक व्यवस्थापकांनी विश्वास ठेवून पैसे वळते केले. मात्र, कंपनीचे मालक प्रकाश वाधवानी यांनी लगेच बँकेला पैशाबाबत विचारणा केली. त्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Story img Loader