चंद्रशेखर बोबडे
नागपूर : करोना लशीच्या तीन मात्रा घेतल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती (ॲन्टिब़ॉडीज) किती प्रमाणात विकसित झाली, याचा अभ्यास केला जात आहे. प्रतिकारशक्ती घटल्याचे आढळल्यास चौथी लस देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली जाईल, अशी माहिती ‘आयसीएमआर’च्या अखत्यारीतील राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्थेचे डॉ. विक्रांत भोर यांनी दिली.
‘इंडियन सायन्स काँग्रेस’च्या निमित्ताने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) संशोधकांचे पथक नागपूर येथे आले होते. विज्ञान प्रदर्शनात आयसीएमआरचे दालनही होते. तेथे डॉ. विक्रांत भोर ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, ‘‘एक वर्षांपासून आम्ही लशीच्या तीन मात्रा घेणाऱ्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचा अभ्यास करीत आहोत. हे सर्व नमुने आयसीएमआरचे कर्मचारी आणि तत्सम लोकांचे आहेत. लस घेतल्यानंतर त्यांच्या शरीरात किती प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती (ॲन्टिब़ॉडीज) विकसित झाली याचा आम्ही अभ्यास करीत आहोत. रोगप्रतिकारशक्तीत घट झाल्याचे आढळल्यास आम्ही केंद्र सरकारला चौथी मात्रा देण्याबाबत शिफारस करू.’’
सर्पदंश मृत्यूचे प्रमाण घटले..
सर्पदंशामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी ‘आयसीएमआर’च्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची माहितीही डॉ. भोर यांनी दिली. त्याचा वापर केल्याने महाराष्ट्रातील डहाणूमध्ये सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ९० टक्के कमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.