नागपूर : वन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट- ब (अराजपत्रित), गट- क व गट- ड संवर्गातील पदभरती प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार आढळल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा पोलिसांकडे तक्रार नोंदवा, असे आवाहन महसूल व वन विभागाने केले आहे.

वन विभागाच्या पदभरतीसाठी काही बाह्य हस्तक्षेप, उमेदवारांना नोकरी देण्याची आमिषे देणे, अफवा पसरविणे, अपप्रचार करणे अशाप्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास त्याविरुद्ध तत्काळ ‘एसीबी’कडे तक्रार नोंदवावी. क्षेत्रीय कार्यालयातील पदे भरण्यासाठी जाहीरात देऊन निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवा, अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. अशाप्रकारच्या अपप्रवृत्ती, अपप्रचार निदर्शनास आल्यास त्याविरुद्ध तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा पोलिस यंत्रणेकडे तक्रार नोंदवावी. तसेच जे उमेदवार भरती प्रक्रियेवर अनैतिक मार्गाने प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, असेही महसूल व वन विभागाने म्हटले आहे.

Pedestrian subway unsafe Demand to appoint security guards Pune news
पिंपरी-चिंचवड: पादचारी भुयारी मार्ग असुरक्षित; सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
maharashtra FASTag mandatory all vehicles
विश्लेषण : राज्यात १ एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक… नेमके काय होणार?
accused ran away, Jaripatka police, Nagpur ,
नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?
Minister Pankaja Mundes clarification on Anjali Damanias allegations
बीडमधील अधिकारी मी नेमलेले नाहीत, आरोपांबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण
Health Department Launches Campaign to Inspect Private Hospitals
आरोग्य विभागाचे खासगी रुग्णालयांवर ‘लक्ष’! राज्यभरात नियमभंग शोधून कारवाईची मोहीम
State orders inspection of hospitals registered under Nursing Home Act
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप! आरोग्य विभागाकडून राज्यभरात तपासणी मोहीम; जिल्हास्तरावर पथकांची नियुक्ती
Story img Loader