चंद्रपूर : अपक्ष आमदार किशोर जोरगेवार महायुती सरकार मध्ये सहभागी आहे. मात्र राज्याचे वनमंत्री तथा लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारापासून दूर आहे. जोरगेवार यांनी मला आता मदत केली नाही तर पुढे मी त्यांना मदत करणार नाही, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांना इशारा दिला.
वन मंत्री तथा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे आमदार किशोर जोरगेवार यांचे राजकीय गुरू आहेत. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. जोरगेवार भाजपातून बाहेर पडले. शिवसेनकडून चंद्रपूर विधानसभेची निवडणूक लढले. त्यांचा पराभव झाला. त्यानंतर यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी राजकारण सुरु ठेवले.
हेही वाचा…चंद्रपूर : पुगलिया असे काय म्हणाले की राजकीय वर्तुळात खळबळ उडाली…
२०१९ मध्ये ते चंद्रपूर विधानसभेतून अपक्ष निवडून आले. आधी उद्धव ठाकरेंच्या सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर शिंदेसोबत ते गुवाहाटीला पोहचले. आमदार होईपर्यंतच्या प्रवासात मुनगंटीवार यांच्याशी त्यांचे अनेकदा खटके उडले. त्यानंतर मुनगंटीवार जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आणखी वितुष्ट वाढले. याकाळात भाजप आणि जोरगेवारांच्या समर्थकांत अनेकदा झोबांझोंबी झाली. दरम्यान आता लोकसभेच्या रिंगणात मुनगंटीवार उतरल्यानंतर जोरगेवारांच्या भूमिककडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहे.
हेही वाचा…पेंच व्याघ्रप्रकल्पात वाघिणीचा संशयास्पद मृत्यू, राज्यात तीन महिन्यात ११ वाघांचा मृत्यू
मात्र जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यात साधी बोलचाल सुद्धा नाही. दुसरीकडे जोरगेवारांचे उजवे हात समजले जाणारे बलराम डोडानी मुनगंटीवार यांच्यावर समाजमाध्यमातून जहरी टिका करीत आहे. डोडानी यांच्या विरोधात यासंदर्भात पोलिसात तक्रारी सुद्धा झाल्या. परंतु त्यांची लेखणी अद्याप थांबलेली नाही. जोरगेवारांच्या पाठींब्या संदर्भात माध्यमांनी आज विचारणा केली असताना मुनगंटीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केले. जोरगेवार यांच्या जवळचा माणून माझ्यावर टिका करीत आहे. त्यांना याची कल्पना नसेल, असे म्हणता येणार नाही. राजकारण एवढे खाली येवू शकत नाही. जोपर्यत माझ्या विरोधातील लिखाण थांबणार नाही. तोपर्यंत त्यांच्याशी बोलण्याचा प्रश्नच नाही. मी स्वाभिमानी आहेत. पडलो तरी चालेल. परंतु खुर्चीसाठी अशा सेटींग करणार नाही. मी विकासाचे राजकारण केले. ज्यांना अशा पद्धतीचे राजकारण करायचे आहे. ते त्यांनी करावे. त्यांनी मला मदत केली तरच मी त्यांनी मदत करेल, असा इशाही मुनगंटीवार यांनी जोरगेवारांना दिला.