वर्धा : गावातील लोकांना दोन वाणी चांगलेच परिचयाचे असतात. एक किराणा माल विकणारा वाणी तर दुसरा शेतात धुडगूस घालणारा वाणी. उधारीत थोडीफार लूट करणारा वाणी बरा, पण शेतातील पिकाची नासधूस करणारा वाणी पिटाळून लावलेला बरा, अशी मानसिकता असते. सर्वांना परिचित असा हा किडा वाणी किंवा पैसा म्हणून ओळखल्या जातो. त्याला मिलीपिड असे शास्त्रीय नाव आहे.

पेरणी केल्यावर सोयाबीन, कापूस, उडीद अश्या पिकांवर त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. निसर्गात याची भूमिका कुजलेल्या काडीकचऱ्याचे विघटन करण्यास मदत करणारा प्राणी अशी आहे. मात्र मोठ्या प्रमाणात त्यांची संख्या वाढल्यास ते कोवळे अंकुर, बियाणे फस्त करतात. रोपे कुरतडतात. कालांतराने रोपावर जावून पानाचा फडशा पाडतात. परिणामी दुबार पेरणीची आपत्ती येवू शकते.

हेही वाचा – …म्हणून शिंदे स्वप्नातही मुख्यमंत्री पदाची खुर्ची पकडून ठेवतात; वडेट्टीवार यांचा टोला

हेही वाचा – चोवीस तासांत तीन हत्याकांडाने उपराजधानी हादरली, पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाही

अंडी, अळी व प्रौढ अवस्थेत त्याची वाटचाल असते. एक मादी तीनशेवर अंडी घालते. प्रौढ अवस्था दीर्घ म्हणजे सात वर्षांची असते. ओलावा असणाऱ्या ठिकाणी ही किड अधिक सक्रिय असते. या वाणीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कृषी विद्यापीठाने विविध उपाय सांगितले आहे. कुजलेला कचरा नष्ट करावा. रात्री जास्त सक्रिय होत असल्याने रात्री शेतात कचऱ्याचे ढीग करावे. सकाळी ते जमा करून मिठाच्या पाण्यात सोडावे. पण प्रामुख्याने पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केल्यास प्रादुर्भाव कमी होतो. चांगला पाऊस पडल्यास किडीचे आपोआप नियंत्रण होते. तसेच अन्य रासायनिक उपायपण आहेत. म्हणून या वाण्यास लवकर आटोक्यात आणलेले बरे, अशी भावना आहे.

Story img Loader