वर्धा : आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालय कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले. सेवाग्राम येथे दिव्यांगाच्या विविध योजनांसाठी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार डॉ पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत कडू यांनी तोफ डागली. बच्चू कडू म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिव बसतात तिथेच सगळा गोंधळ आहे. मंत्रालयातच पाणी मुरते. हे सहा मजले सुधारले तर अख्खा महाराष्ट्र सुधारेल, अशी टीका कडू यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… रुक्मिणी हरणाशी आहे अमरावतीच्‍या अंबादेवी मंदिराचा संबंध! काय आहे आख्यायिका, जाणून घ्या…

हेही वाचा… वीज दुरुस्तीसाठी खांबावर चढला आणि क्षणात कोळसा झाला, नेर येथील घटनेने खळबळ

अधिकाऱ्यांच्या कारभारावर त्यांनी टीका केली. माणसे मोठी असली पाहिजे, घरे मोठी असून फायदा नाही. एवढ्या मोठ्या मंत्रालयात कालच एका अधिकाऱ्यास झापले. तिथेच चिरीमिरी चालते. एका बदली साठी मंत्रालयात काय काय करावे लागते, याची सर्वांना कल्पना आहे. यात बदल आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. तसेच दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातीलच नव्हे तर जगातील पहिले राज्य असल्याची प्रशस्ती पण त्यांनी दिली. यावेळी उपस्थित दिव्यांग बंधवांशी त्यांनी संवाद साधला. शेकडो दीव्यांग बांधव या शिबिरात सहभागी झाले आहेत. त्यांची चांगलीच गर्दी उसळली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If the work process improved by mantralaya the state will progress bacchu kadu pmd 64 asj