हिंगणघाट शहरातील नॅनो पार्क येथील एका घरात अवैधरित्या देहव्यापार चालत असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. ग्राहकांना या ठिकाणी आणण्यासाठी खास फॉर्चूनर या आलिशान गाडीचा उपयोग केला जात असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे एक बनावट ग्राहक या स्थळी पाठवण्यात आला. पीडित महिलेकडून शरीर विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या छाप्यात मंगेश दिलीप सुके व उमेश नारायण कोटकरसह एका महिलेस ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा >>>सात महिन्यांच्या बंदीवासानंतर चित्त्यांनी ठोकली धूम! नामिबियातील चित्ते अखेर कुनोच्या खुल्या जंगलात
विचारपूस केल्यावर आरोपी मंगेश हा पीडित मुली व महिलांकडून आर्थिक फायद्यासाठी देहव्यापार करवून घेत असे. यासाठी तो त्याच्या फॉर्चूनर या गाडीचा उपयोग करीत होता. तिघांनाही अटक झाली. त्यांच्याकडून ॲपल व अन्य कंपनीचे चार मोबाईल, रोख रक्कम व वाहन जप्त करण्यात आले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी अवैध देहव्यापार चालत असल्याची माहिती पुढे आल्यानंतर पोलीस अधीक्षक नरुल हसन यांनी तो बंद करण्यासाठी खास मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी काही ठिकाणी धाड पडली होती. गुन्हे शाखेचे संदीप कापडे यांच्या चमूने ही कामगिरी केली.