नागपूर : नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील प्रवेशाला सुरुवात झाली आहे. मात्र, शहर आणि जिल्ह्यातील अनेक अनधिकृत शाळा शासनाने बंद केल्या असतानाही त्या शाळांकडून पालकांची फसवणूक केली जात असल्याच्या घटना समोर आल्या. त्यामुळे शाळांना मान्यता आहे की नाही, याबाबत खात्री करावी, तसेच सदर मान्यता कोणत्या शिक्षण मंडळाची (राज्य, सीबीएसई, आयसीएसई) आहे, याची खात्री केल्यानंतरच प्रवेश घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी केले आहे.

क्षेत्रीय अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात अनधिकृत शाळा सुरू होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सुरू झाल्यास अशा शाळा तत्काळ बंद करण्यात याव्यात. प्रशासकीय बाबी पूर्ण करूनही शाळा बंद होत नसल्यास संबंधित शाळांवर गुन्हे नोंदविण्यात यावे व याबाबत पालकांना अवगत करण्यात यावे, असे निर्देश गटशिक्षणाधिकारी व शिक्षणविस्तार अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – जिंकण्याची क्षमता असेल तरच जागा मागा, शहा यांनी शिंदे-पवारांना बजावले !

हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…

हेही वाचा – नागपूर विद्यापीठ : विद्यार्थ्यांचे शुल्क घेणाऱ्या कर्मचाऱ्याने केला ८० लाख रुपयांचा घोटाळा, वाचा काय आहे प्रकार?

शिक्षण विभागाकडून काही अनधिकृत शाळांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल होऊनही त्या शाळा प्रत्यक्षात बंद करत नाहीत. अशात बालकांचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ या कायद्याचे उल्लंघन ज्या शाळांकडून होत आहे अशा शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यास प्रवेश देऊ नये. पालकांनी शाळेमध्ये पाल्यास प्रवेश देताना शाळेस मान्यता असल्याबाबतची खात्री करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader