भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात १९ सप्टेंबर पर्यंत संमिश्र पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात सर्वदूर आज १५ व १६ सप्टेंबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> नागपूर: या मारबत आणि बडग्याचे मिरवणुकीनंतर करतात काय?
१७ ते १९ सप्टेंबर दरम्यान बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दरम्यान स्थानिय कृषी विज्ञान केंद्र अंतर्गतच्या जिल्हा कृषी हवामान केंद्राने शेतकऱ्यांना निर्देशवजा सूचनाही दिल्या आहे. मुग, उडीद पिकांची कापणी झाली असल्यास ,नुकसान टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था करावी. कपाशी, तुर, सोयाबीन पिकातील फवारणी व आंतरमशागतीची कामे पाऊसमान लक्षात घेऊन करावी. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पावसाचे पाणी शेतात साचणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याने गुरांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे असे सुचविण्यात आले आहे.