मुस्लिम व्यक्तीच्या अंत्ययात्रेला मार्ग मोकळा करून देण्यासाठी गणेश विसर्जनाची मिरवणूक काही काळ थांबविण्यात आल्याची घटना जातीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या अचलपूर शहरात घडली. समाजात सध्या काही समाज विघातक घटकांकडून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असताना अचलपूर शहराच्या हिंदू मुस्लिम बांधवांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत मात्र ऐक्याचे दर्शन घडवून एक आदर्श निर्माण केला. हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडविणाऱ्या अचलपुरातील झेंडा चौक येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.बिलानपुरा अचलपूर येथील एका मुस्लिम व्यक्तीचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्याच दिवशी गणपती सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीचा दिवस असल्याने अंत्ययात्रा कशी काढावी हा यक्षप्रश्न त्यांच्या कुटुंबातील लोकांना पडला. घरच्या नागरिकांनी याबाबत अचलपूर पोलिसांची संपर्क केला पोलिसांनी तत्काळ मृत्यू झालेल्या नागरिकांचे घर गाठले आणि नातेवाईकांसोबत चर्चा केली तसेच अंत्ययात्रेला पूर्ण संरक्षण देण्याची हमी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा