एपीएल शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद, मात्र रक्कमेची प्रतीक्षाच
अकोला: एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना धान्याऐवजी दर महिन्याला प्रत्येकी १५० रुपये थेट रक्कम जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने मार्च महिन्यात घेतला. मात्र, या निर्णयाच्या अंमलबजावधीची प्रतीक्षा लाभार्थी शेतकऱ्यांना लागली आहे. जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती पुरवठा विभागाला प्राप्त झाली नसल्याने योजनेची अंमलबजाणी रखडली आहे. त्याचा फटका १.९२ लाभार्थ्यांना बसत आहे.अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांसह एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना दरमहा सवलतीच्या दरात अन्नधान्यांचे वितरण करण्यात येत होते. जानेवारी २०२३ पासून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांचे दरमहा मोफत अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असले तरी एपीएल शिधापत्रिकाधारकांचा अन्नधान्याचा लाभ बंद करण्यात आला आहे. एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना धान्याऐवजी प्रतिमहिना प्रतिव्यक्ती १५० रुपये देण्याचा निर्णय शासनाने मार्च महिन्यात घेतला. जानेवारी महिन्यापासून दरमहा प्रत्येकी १५० रुपये अनुदानाची रक्कम भेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निश्चित करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा