नागपूर : दिल्लीत जी २० शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेचे नियोजन केले गेले आहे. प्रवाशांनी यादीत दिलेल्या तारखा आणि गाड्या लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. उत्तर रेल्वे ने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली येथे ९ आणि १० सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या जी २० शिखर परिषदेमुळे सुमारे २०० रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यातला आला आहे. आणखी १०० गाड्यावर त्याचा परिणाम होणार आहे. काही गाड्याचे मार्ग बदलण्यात आले तर काही सुटण्याचे स्थानक बदलण्यात आले आहे. आणि काही गाड्याच्या वेळेत बदल करण्यात येत आहे. दिल्लीत रेल्वेने रद्द केलेल्या विविध गाड्यांची यादी जाहीर केली आहे.

हेही वाचा >>> आकाशी झेप घे रे पाखरा! नागपूर ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रातील उपचारानंतर ‘ती’ दोन गिधाडे…

अधिकृत अधिसूचनेनुसार २०० हून अधिक गाड्या यामुळे प्रभावित होणार असून ३०० हून अधिक गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे ७ ते १० सप्टेंबर दरम्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्याचे हाल होणार आहे, तेव्हा या कालावधीत प्रवास करणाऱ्यांनी खबरदारी घ्यायला हवी. महाराष्ट्रातून धावणाऱ्या गाड्याना देखील या बदलाचा फटका बसला आहे. २२१२५नागपूर- अमृतसर एक्सप्रेस, १२९५१मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली तेजस राजधानी, २२२०९ मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली दुरातो, २०८०५विशाखापट्टणम- नवी दिल्ली एपी एक्सप्रेस, ११०७८जम्मू तवी- पुणे झेलम एक्सप्रेस, १२९२६अमृतसर-मुंबई सेंट्रल पश्चिम एक्सप्रेस यांचा टर्मिनल बदलण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important for railway passengers 200 trains cancelled rbt 74 ysh
Show comments