वर्धा : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्याची तत्पर दखल राज्य शासनाने घेतली आहे. हा वर्ग नाराजीकडे वळू नये म्हणून २९ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता मुंबईत सह्याद्री सभागृहात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी बैठक बोलावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत आहे. ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत ही बैठक असल्याचे सूचित आहे. यास खासदार रामदास तडस तसेच रामभाऊ पेरकर, विष्णूजी वखरे, साईनाथ जाधव व वसंतराव हारकळ हे विशेष निमंत्रित आहेत.

हेही वाचा – ..अन् चक्क जावयाने थाटला सासूसह संसार!

हेही वाचा – ३० सप्टेंबरपर्यंत अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा

मराठा समाजास ओबीसी प्रवर्गात स्थान देण्याचा मुद्दा आला होता तेव्हा खासदार तडस यांनी, आता आणखी किती समाज या आरक्षणात घुसवता, असा संतप्त सवाल जाहीरपणे केला होता. त्यांचा समावेश या बैठकीत असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.