गोंदिया : रेल्वे गाड्यांची सुरक्षा आणि उशिरा धावत असल्यामुळे त्यात वेळेचे व्यवस्थापन करिता मेमू गाड्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. रेल्वे प्रशासन, दक्षिण पूर्व नागपूर विभागामार्फत विविध सुरक्षा संबंधित देखभालीची कामे आणि गाड्यांची वक्तशीरपणा राखण्याशी संबंधित कामे केली जात आहेत. या सर्व कामांदरम्यान केवळ खालील मेमु गाड्या रेल्वे वाहतुकीला कमीत कमी व्यत्यय आणून रद्द करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यात गाडी क्र. ०८७१४ इतवारी-बालाघाट मेमू, गाडी क्र.०८७१५ बालाघाट-इतवारी मेमू, गाडी क्र. ०८८०६ या गाड्या ९ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट पर्यंत आणि गोंदिया-वडसा मेमू, गाडी क्र. ०८८०८ वडसा-चांदाफोर्ट मेमू व गाडी क्र. ०८८०५ चांदाफोर्ट-गोंदिया मेमू चांदाफोर्ट, गाडी क्र. ०८७२३ डोंगरगड-गोंदिया मेमू डोंगरगड या गाड्या १० ऑगस्ट ते २३ ऑगस्ट पर्यंत पुढील १४ दिवस रद्द  करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> मध्य रेल्वेच्या ९ ते २३ ऑगस्टदरम्यान वेगवेगळ्या तारखांना १९ गाड्या रद्द; वाचा कारण काय ते….

याशिवाय गाडी क्र.  ०८७२१ रायपूर-दुर्ग-डोंगरगड मेमू दुर्ग ते डोंगरगड दरम्यान ९ ते २२ ऑगस्ट दरम्यान रद्द राहील आणि ट्रेन क्र. ०७०२४ गोंदिया-डोंगरगड-दुर्ग-रायपूर मेमू गोंदिया ते दुर्ग दरम्यान १० ते २३ ऑगस्ट दरम्यान रद्द राहील असे रेल्वे प्रशासन, दक्षिण पूर्व नागपूर विभागामार्फत कळविण्यात आले आहे. विविध प्रकारच्या सुरक्षेचे कारण आणि रेल्वेचे वेळेचे व्यवस्थापन करिता वेळीच सुधारणा करण्याकरिता रेल्वेला असे नियोजन करावे लागते त्याच अनुषंगाने सदर गाड्या पुढील १४ दिवसांकरिता रद्द करण्यात आल्या असल्याचे गोंदिया स्थानकाचे रेल्वे स्टेशन मास्तर कुशवाह यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important news for railway passengers trains canceled for 14 days sar 75 ysh
Show comments