नागपूर : धंतोली परिसरातील बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेची दखल उच्च न्यायालयाने घेतली व वाहतूक पोलिसांना वाहतुकीचे नव्याने नियोजन करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या दणक्यानंतर वाहतूक पोलिसांनी धंतोलीतील तीन रस्त्यांवरून एकेरी वाहतूक तर तब्बल १८ ठिकाणी रस्त्यावर ‘नो पार्किंग झोन’ तयार केला आहे. येत्या २० जुलैपासून हे नवे नियम लागू होतील.

धंतोली परिसर रहिवासी क्षेत्र असूनही या परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्णालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने बांधण्यात आली. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि वाहनांची गर्दी वाढायला लागली. याचा स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी धंतोली परिसरातील नागरिकांनी उच्च न्यायालयात जनहित याचीका दाखल केली. वाहतूक पोलिसांनी २०१७ प्रमाणे धंतोलीतील वाहनांचे आवागमन, पार्किंग याबाबत सर्वेक्षण करून काही मार्ग एकेरी, नो पार्किंग करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वाहतूक पोलिसांनी धंतोलीतील तीन रस्ते एकेरी मार्ग तर तब्बल १८ रस्त्यांवर नो पार्किंग झोन तयार केला आहे.

Electricity system Maharashtra, strike employees,
राज्यातील वीज यंत्रणा कोलमडणार! कर्मचाऱ्यांनी पुन्हा उगारले संपाचे अस्त्र
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Pimpri, Notice to Engineers, Road Repair Works pimpri,
पिंपरी : रस्ते दुरुस्तीच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांना नोटीस; काय आहे कारण?
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 
msrtc employees strike continues as no solution found on demands
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच; खासगी चालकाना पाचारण करण्याचा विचार
incomplete work of first phase of concreting road complete by may 2025
सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मे २०२५ ची मुदत; कामे पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
Thane Multi Storey vehicle Parking
ठाणे : वागळे इस्टेटमधील बहुमजली वाहनतळाची क्षमता वाढणार

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांनो; सिकंदराबाद ते भावनगर विशेष रेल्वे अकोलामार्गे धावणार

नो पार्किंग कुठे?

न्यूरॉन रुग्णालय ते भगवतदर्शन इमारतीपर्यंत मार्गावरील दोन्ही बाजूने ५० मीटरपर्यंत वाहनासाठी नो पार्किंग, कुंभरे ज्वेलर्स ते गोरक्षण कंम्पाउंडपर्यंत मार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांसाठी नो-पार्किंग, भिवापूरकर चेंम्बर ते धंतोली गार्डन टी पॉइंन्टपर्यंत दोन्ही बाजूने नो-पार्किंग, मिश्रा हाऊस ते टिळक विद्यालयापर्यंत मार्गाच्या दोन्ही बाजूने ५० मीटरपर्यंत नो पार्किंग, श्रीकृष्ण हृदयालय ते काँग्रेसनगर टी पॉईंटपर्यंत दोन्ही बाजूने नो पार्किंग, न्यूरॉन हॉस्पिटल ते जनता चौकापर्यंत मार्गाच्या दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहनांकरिता नो पार्किंग असेल. एच.पी.पेट्रोल पंप ते काँग्रेसनगर टी पॉईंटपर्यत रस्त्याच्या दोन्ही बाजूने नो पार्किंग, पत्रकार भवन ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयापर्यंत, मेहाडिया चौकपर्यंत चारचाकी वाहनांना ‘सिंगल लेन पार्किंग’ देण्यात आली आहे. मेहाडिया चौक ते राजकमल अपार्टमेन्टपर्यंत दुचाकी वाहनांसाठी सिंगल लेन पार्किंग. धंतोली गार्डन लगत उत्तर-दक्षिण आणि पश्चिम बाजूने अशा तिन्ही भागांत चारचाकी वाहनांसाठी सिंगल लेन पार्किंग, मेहाडिया चौक ते होमगार्ड कार्यालय मार्गावरील धंतोली गार्डनच्या पूर्व बाजूने सिंगल लेन दुचाकी पार्किंग करण्यात येणार आहे. राहाटे चौक मुळिक निवासच्या उत्तरेकडील बाजूस ते स्टार हॉटेलच्या दक्षिणेकडील बाजूस खाली जागेत चारचाकी वाहनांसाठी पार्किंग असेल.

या मार्गांवर एकेरी वाहतूक…

धंतोली गार्डन लगत एका बाजूला सिंगल लेन चारचाकी वाहनांसाठी पार्किंग असेल. सिल्व्हर पॅलेसकडून वरंभे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद केली असून हॉस्पिटलकडून सिल्व्हर पॅलेसकडे जाणारा मार्ग वाहतुकीस खुला राहील. अमरज्योती कॉम्प्लेक्सकडून डुंभरे ज्वेलर्सकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीस बंदी आहे. राजकमल कुंभरे ज्वेलर्सकडून अमरज्योती कॉम्प्लेक्सकडे जाणारा मार्ग वाहतुकीस खुला राहील.

हेही वाचा – गडकरी पुत्राच्या कंपनीतील संचालकांच्या पत्नीची महापारेषणवर नियुक्ती

रुग्णवाहिका, शासकीय वाहनांना सूट

शासकीय वाहने, पोलिसांची वाहने, अग्निशमन दलाची वाहने व रुग्णवाहिका यांना ही अधिसूचना लागू होणार नाही. तसेच संरक्षित व अतिमहत्वाचे व्यक्ती यांच्या ताफ्यातील वाहने रोडच्या दोन्ही बाजूने ठेवता येतील.