भंडारा : पवनी तालुक्यातील गुडेगाव येथे काही दिवसांपूर्वी एका गुरख्याला वाघाने ठार केल्याची घटना घडल्यानंतर आज, बुधवारी शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या खातखेडा येथील एका ५८ वर्षीय व्यक्तीला वाघाच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला. ईश्वर सोमा मोटघरे, असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये रोष असून वाघाला जोपर्यंत जेरबंद करीत नाही, तोपर्यंत मृतदेहाला हात लावू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेळ्या चरण्यास गेलेले ईश्वर मोटघरे  खातखेडाच्या बसस्थानकावर उभे असताना वाघाने  त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या सहायक उपवनसंरक्षक यशवंत नागुलवार, वनपाल वावरे , गुप्ता यांना संतप्त गावकऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम भंडारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, नंतर पुढील उपचारासाठी नागपुरातील खासगी इस्पितळात हलवण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imprison the tiger that kills the two people villagers aggressive ksn 82 ysh
Show comments