नागपूर: भारताने २००१ ते २०२२ या कालावधीत आगीमुळे तब्बल ३.५९ लाख हेक्टर वृक्ष आच्छादन गमावले आणि इतर सर्व नुकसानीमुळे २.१५ दशलक्ष हेक्टर नुकसान झाले. या २१ वर्षाच्या कालावधीत सर्वाधिक नुकसान २००८ साली झाले. कारण यात तीन हजार हेक्टर वृक्ष आच्छादनाचे नुकसान आगीमुळे झाले, भारतीय वनसर्वेक्षण अहवालातूनच ही माहिती समोर आली आहे.
भारतात फेब्रुवारीच्या मध्यात आगीचा हंगाम सुरू होतो आणि सुमारे १४ आठवडे चालतो. मात्र, २२ ऑगस्ट २०२२ आणि २८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत १४ हजार ६८९ वेळा ‘फायर अलर्ट’ मिळाला. जंगलाच्या आगीत मोठ्या प्रमाणात हवामान संकटामुळे वाढ होते. जंगलातील आगीची तीव्रता वाढत आहे आणि २० वर्षांपूर्वीच्या तुलनेत जागतिक स्तरावर जवळपास दुप्पट वृक्ष आच्छादन जळत आहे. उष्ण कटिबंधातील आगीमुळे वृक्ष आच्छादनाचे नुकसान होत आहे आणि त्याचा परिणाम कार्बन उत्सर्जनावर होत आहे.
हेही वाचा… धक्कादायक! पती अनैतिक संबंधात ठरला अडसर; पत्नीने वडिलांच्या मदतीने केली हत्या
रशिया, कॅनडा, अमेरिका, फिनलंड, नॉर्वे, चीन आणि जपानमधील मोठ्या जंगलांना व्यापणारी ट्रॉपिकल जंगले आणि त्यानंतर ॲमेझॉनसारखे जैवविविधतेचे हॉटस्पॉट्स आणि आग्नेय-आशिया आणि भारतातील वर्षावनांचा समावेश असलेल्या उष्णकटिबंधीय जंगलांवर सर्वात वाईट परिणाम झाला आहे. उष्ण कटिबंधातील आगीमुळे वृक्ष कव्हरचे वाढते नुकसान जास्त कार्बन उत्सर्जनास कारणीभूत ठरत आहे. नोव्हेंबर २०२१ ते जून २०२२ दरम्यान भारतातील जंगलात दोन लाख २३ हजार ३३३ वेळा आग लागली. तर नोव्हेंबर २०२२ ते जून २०२३ दरम्यान दोन लाख १२ हजार २४९ वेळा आग लागली.