नागपूर: मागील दोन आठवडे पावसाने महाराष्ट्रात चांगलेच थैमान घातले होते. संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणारा पाऊस आता पुढील काही दिवसांसाठी विश्रांती घेणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सूर्यनारायण डोकावणार आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच थैमान घालणाऱ्या पावसाने आता अखेरच्या टप्प्यातही धुमाकूळ घातल्यानंतर काहीशी उसंत घेतली आहे. सतत बरसणाऱ्या पावसाने रविवारीसुद्धा मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये विश्रांती घेतली. असेच काहीसे चित्र येत्या दिवसांमध्येही पाहायला मिळणार आहे. लख्ख सूर्यप्रकाशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेकांनाच मोठा दिलासाही मिळणार आहे.
हेही वाचा… कार्यकर्ते टिकवण्यासाठी ‘चॉकलेट’ वाटण्याशिवाय पर्याय नसतो! राजकीय विवशतेबाबत नितीन गडकरींची कबुली
थोडक्यात हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर काही अंशी कमी होणार आहे. ज्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा एकदा रुळावर येईल.