नागपूर : शहरातील खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या तोडत असलेल्या वाहतुकीच्या नियमांची कुंडली प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) नागपूर शहर आणि शहर वाहतूक पोलिसांनी जमवली आहे. या विषयावर बुधवारी नागपुरातील आरटीओ कार्यालयात झालेल्या बैठकीत ट्रॅव्हल्सने स्वत:च्या कामात सुधारणा न केल्यास कारवाईची तंबी देण्यात आली.

बैठकीला पोलीस उपआयुक्त (वाहतूक) चेतना तिडके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर ग्रामीण राजेश सरक, अशफाक अहमद, हर्षल डाके, स्नेहा मेंढेसह शहर व ग्रामीण भागातील आरटीओ आणि वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी, ट्रॅव्हल्स कंपन्यांचे मालक उपस्थित होते. प्रथम वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून नियमबाह्यरीत्या शहरात कुठे-कुठे मालवाहतुकीसाठी बसमध्ये नियमबाह्य माल भरले जातात, शहरातील विविध रस्त्यांचे काम सुरू असलेल्यासह इतर लहान रस्त्यांवर बस चालवल्याने कुठे वाहतूक कोंडी होते, प्रवाशांना रस्त्यावर कुठेही थांबून घेतले जात असल्याने निर्माण होणारी वाहतूक समस्या, गणेश टेकडी येथील बसस्थानक स्थलांतरित करण्यासह इतरही अनेक पुरावे छायाचित्रासह येथे दाखवले गेले. प्रथम ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन बैठकीत आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून ट्रॅव्हल्स कंपन्यांना दिले गेले. त्याचे पालन न झाल्यास कडक कारवाईचा इशाराही दिला गेला. परंतु ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सहकार करून सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, म्हणून सर्व मदत करण्याचे आश्वासन प्रवाशांना दिले. दरम्यान, प्रवाशांच्या सूचनेसाठी यापूर्वीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्याही अंमलबजावणीचे आवाहन यावेळी केले गेले. याप्रसंगी शहरातील बहुतांश ट्रॅव्हल्स कंपन्यांचे मालक अथवा संबंधित कंपनीतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

pune ranked 4th globally for traffic congestion as tomtom traffic index report
विश्लेषण : वाहतूक कोंडीचे परिणाम काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
pune traffic jam issue
वाहतुकीचे तीनतेरा
drug, Nagpur , drug addiction, narcotics ,
नागपूर शहर बनले नशाखोरीचे केंद्र, वर्षभरात ३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
Pune ranks fourth in the world in slow traffic Pune print news
मंद वाहतुकीत पुणे जगात चौथे
Heavy vehicles banned in Narhe area on outer ring road
पुणे : बाह्यवळण मार्गावरील नऱ्हे परिसरात जड वाहनांना बंदी
private bus drivers, Amravati, RTO, action by RTO,
अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई

हेही वाचा – अन् हातावेगळा पंजा घेऊन रुग्ण रुग्णालयात.. नागपूर ‘एम्स’ला यशस्वी प्रत्यारोपण

हेही वाचा – पूर्व विदर्भात डेंग्यूग्रस्तांची संख्या चारपट! नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

ट्रॅव्हल्समुळे वाहतूक कोंडी होणारे स्थळ

शहरातील जाधव चौक, लोहापूल चौक, शीतला माता मंदिर चौक, बोले पेट्रोल पंप चौक, रविनगर चौक, रहाटे काॅलनी चौक, गीतांजली टाॅकिज चौक, गणेश टेकडी येथील बसस्थानक परसरात रोजच ट्रॅव्हल्समुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

Story img Loader