अकोला : जिल्ह्यातून चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १० वर्षीय चिमुकलीवर नात्यातील नराधम तरुणाने लैंगिक अत्याचार करून ठार मारण्याची धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची तत्काळ दखल घेत शहरातील अकोट फैल पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला शुक्रवारी सकाळी अटक केली. यश गवई (२४) असे त्या नराधम तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. बदलापूर येथे चिमुकल्या मुलींच्या अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यातून रोष व्यक्त झाला. अकोला जिल्ह्यात सुद्धा नराधम शिक्षकाने आठवीतील सहा मुलींना अश्लिल चित्रफित दाखवून त्यांचा विनयभंग केला.

हेही वाचा : कारण राजकारण : नाना पटोलेंना मतदारसंघातच रोखण्याचे भाजपपुढे आव्हान

Crime News
Crime News : TikTok वर व्हिडीओ पोस्ट करण्यावरून पोटच्या १५ वर्षीय मुलीचं ‘ऑनर किलिंग’; US मधून पाकिस्तानात परतल्यानंतर बापाने घातल्या गोळ्या
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
class 6 girl school raped in Porbandar
शिक्षकाचा सहावीतल्या विद्यार्थीनीवर बलात्कार; वाच्यता केल्यास खिडकीतून फेकण्याची दिली होती धमकी
rape on minor girl
प्रजासत्ताक दिनी ७० वर्षीय इसमाचा ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक
Teacher gets 5 years in jail for molesting girls
अश्लील कृत्य करणाऱ्या शिकवणी चालकाला सक्तमजुरी
truth and dare rape news
पिंपरी : रावेतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
woman alleges rape after locking in home forced for religious conversion
पुणे : धर्मांतर करण्यासाठी महिलेला डांबून ठेवून बलात्कार; विमानतळ पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक
Minor girl raped by friend on Instagram crime news Mumbai news
मुंबईः इन्स्टाग्रामवरील मित्राकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; खासगी छायाचित्र नातेवाईक व परिचीत व्यक्तींना पाठवले

अकोला व वाशिम जिल्ह्यात मुलींच्या विनयभंग झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर आता तरुणाने १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. राज्यात मुली, युवती व महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तेल्हारा तालुक्यातील तक्रारदार कुटुंब शहरातील वल्लभनगर येथे नातेवाईकांकडे आले होते. त्यांच्यासोबत १० वर्षांची पीडित मुलगी देखील आली होती. ते अकोला तालुक्यातील तामसवाडी गावात देखील गेले होते. या गावात आरोपी नराधम तरुणाने अत्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यासंदर्भात कुणालाही सांगितल्यास आरोपीने पीडितेला ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली.

हेही वाचा : नागपूर : रामझुला हिट अँड रन प्रकरण; आरोपी रितू मालू धनाढ्य असल्याने पोलिसांकडून तपासात उणिवा…

दरम्यान, आई-वडील काम आटोपून घरी परतल्यानंतर पीडितेने तिच्यासोबत घडलेला प्रकार पालकांना सांगितला. या अगोदर साधारणत: एक वर्षापूर्वी तक्रारदार यांच्या तेल्हारा तालुक्यातील गावात देखील आरोपी तरुणाचे पीडितेवर अत्याचार केला होता. चिमुकल्या मुलीने हे सर्व सांगताच आई-वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने अकोट फैल पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी पीडितेची जबानी घेऊन तात्काळ अत्याचार आणि बाल संरक्षण कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला. नराधम आरोपीचा शोध घेऊन त्याला वल्लभनगर येथून अटक केली आहे. या प्रकरणात महिला पोलीस अधिकारी सखोल तपास करीत असल्याची माहिती अकोट फैल पोलीस ठाण्याचे प्रभारी गजानन राठोड यांनी दिली. विकृत मनोवृत्तीमुळे अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे.

Story img Loader