अकोला : पोलीस दलात नोकरी लावून देण्याच्या नावावर तीन जणांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस विभागात व सैन्य दलात नोकरी लावून देण्याच्या नावावर आरोपीने अनेकांची फसवणूक केली. होमगार्डमध्ये कार्य करणाऱ्या एकाला आरोपीने महाराष्ट्र पोलीस खात्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : अकोला : अतिवृष्टीमुळे १४ हजारहून अधिक हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

नियुक्तीची खोटी कागदपत्रे खरे असल्याचे भासवून नोकरी करीता वारंवार नगदी व ऑनलाइनद्वारे एकूण १८ लाख रुपये घेतले. या शिवाय आणखी गावातील एका तक्रारदाराच्या मुलीला पोलीस खात्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडूनही २० लाख ४२ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. आणखी एकाच्या तक्रारीनुसार एका युवकाला सैन्य दलात नोकरी लावून देण्याच्या नावावर त्याच्याकडून एकूण १५ लाख रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या तिघांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली.

हेही वाचा : बंगालच्या उपसागरात ३ डिसेंबरपर्यंत चक्रीवादळ; आज विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणला ‘यलो अलर्ट’

या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चौकशी अहवाल तयार करून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात ५३ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.