अकोला : महिलेने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून व्यसनाधीन पतीची हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. घटनेच्या तब्बल २२ दिवसांनंतर प्रकरणाचा उलगडा झाला. या हत्येप्रकरणी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.
अकोट फैल पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम उगवा शेतशिवारात ५० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मृताच्या डोक्यावर, छातीवर मारहाण केल्याच्या जखमा होत्या. पोलिसांनी सर्व बेपत्ता प्रकरणाची तपासणी सुरू केली. तपासात ओळख निष्पन्न झाली. विद्यावान बरीळाम प्रधान (५०, रा.कृषी नगर) असे मृतकाचे नाव आहे.
हेही वाचा : “…तर कधी तुरुंगात जावे लागेल सांगता येत नाही,” केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले असे का म्हणाले? वाचा…
विद्यावान आणि पत्नी कुंकूला (४०) यांच्यातील वादामुळे ते वेगळे राहत होते. दोन ते तीन वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येला पती जबाबदार असल्याचे पत्नीला वाटत होते. त्यामुळे दोघांमध्ये वाद होता. मुलाच्या मृत्यूला जबाबदार पतीला संपवण्याचा कट पत्नीने सुरू केला. ती काम करीत असलेल्या हॉटेलमध्ये लकी श्रवणजी तेलंते (२४, रा. मोठी उमरी, अकोला) हा तरुण काम करत होता. महिलेने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
हेही वाचा : बोरवणकरांच्या आरोपाची चौकशी करा- वडेट्टीवार
तिने आपल्या मनातील दुःख त्याच्यासमोर मांडले. त्याच्यासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट सुरू झाला. तिच्या पतीची संपूर्ण माहिती लकीने गोळा केली. मृतक दारूच्या आहारी गेल्याचा फायदा उलचण्याचे त्याने ठरवले. २४ सप्टेंबर रोजी उगवा येथील शेतात लकीने दारू पाजून विद्यावान याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले. जबर मारहाण केली. यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी लकी घटनास्थळावरून पसार झाला. १८ दिवसानंतर मृतदेह आढळून आला. मृतकाच्या नातेवाईकांनी त्याच्या पत्नीवर संशय घेतला.
हेही वाचा : नागपूर : ड्रगमाफिया ललित पाटीलला सरकारने पळवले; विरोधी पक्ष नेते वडेट्टीवारांचा आरोप
विद्यावान एका तरुणासोबत नेहमी राहत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीदरम्यान लकीने घटनेचा खुलासा करून महिलेच्या सांगण्यानुसार गुन्हा केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना अकोट फैल पोलिसांनी अटक केली आहे.