अकोला : जिल्ह्यात युवती व महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्याचे चित्र आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्यांचा तपास करून अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने तब्बल ११० प्रकरणांचा उलगडा केला. त्यामुळे युवती व महिलांची पुन्हा आपल्या कुटुंबासोबत भेट होऊ शकली. बेपत्ता झालेल्या, अपहरण व पळवून नेलेल्या युवती व महिलांच्या शोधासाठी अनैतिक मानवी वाहतूक कक्ष कार्यरत आहे. अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने आतापर्यंत ११० गुन्हे उघडकीस आणले आहेत. ७७ पळवून नेलेले, अपहरण झालेले गुन्हे व ३३ बेपत्ता असलेल्या महिला व युवतींचा शोध, अशा प्रकारे एकूण ११० गुन्ह्यांचा उलगडा अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : उपराजधानीत वाढल्या पिस्तूलधारी टोळ्या! गोरेवाड्यात काडतूस…

पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी मुलीला पळवून नेल्याची तक्रार झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पीडित मुलीचा पुणे, बुलढाणा, नाशिक येथे शोध घेण्यात आला. अखेर बाळापूर बसस्थानक येथे मुलगी असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला मिळाली. यावरुन पोलिसांनी तिला व सोबत असलेल्या आरोपीस ताब्यात घेतले. पीडित मुलीला अनैतिक मानवी वाहतूक कक्ष येथे रवाना करण्यात आले. आरोपीला तपासासाठी पातूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola anti human trafficking unit report young girl and woman missing cases increased ppd 88 css