अकोला : शहरातील रतनलाल प्लॉट चौकातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेच्या छतावर एक नवजात मृत अर्भक व मांसाचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली. रविवारी दुपारी मुले क्रिकेट खेळत असतांना हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील रतनलाल प्लॉट स्थित जिल्हा परिषदेची बंद पडलेली उर्दू माध्यमिक शाळेची इमारत आहे. या शाळेच्या परिसरात काही मुले क्रिकेट खेळत होती. चेंडू इमारतीच्या छतावर गेल्याने तो काढण्यासाठी मुले देखील गेली. इमारतीवर नवजात अर्भक मृतावस्थेत दिसून आल्याने मुले घाबरली. त्यांनी परिसरातील नागरिकांना सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : फडणवीस म्हणाले, “गारपीटग्रस्तांना मदत करू”

अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कुळकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा व सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चार ते पाच महिन्याचे हे अर्भक असल्याची प्राथमिक माहिती आहे. सोबतच प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मांसाचे तुकडे देखील दिसून आले. पोलिसांनी पंचनामा करत अर्भक ताब्यात घेतले. ते तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola at ratanlal plot chowk urdu medium zilla parishad school dead infant and pieces of meat found ppd 88 css