अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी बाळापूर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने भाजपचे बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी जाहीर केली. विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी यांना शिवसेना शिंदे गटाने रिसोड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या दोन्ही मतदारसंघावर महायुतीतील प्रमुख तिन्ही घटक पक्षांनी दावा केला होता. अखेर महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटला. महायुतीमध्ये राजकीय तडजोड करण्यात आली असून बाळापूर मतदारसंघ शिवसेनेसाठी सुटला तरी उमेदवार हा भाजपमधून देण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाची दुसरी यादी रविवारी रात्री जाहीर केली. यामध्ये शिवसेना शिंदे गटाने बाळापूर मतदारसंघातून बळीराम सिरस्कार, तर रिसोड मतदारसंघातून भावना गवळी यांना उमेदवारी दिली. बाळापूर आणि रिसोड मतदारसंघासाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून ओढाताण सुरू होती. युतीमध्ये परंपरागत या जागांवर शिवसेना लढत असल्याने शिंदे गटाने या दोन्ही मतदारसंघासाठी आग्रह धरला. भाजपने अखेर महायुतीत बाळापूर आणि रिसोड मतदारसंघ शिवसेना शिंदे गटासाठी सोडले. बाळापूर मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटात अनेक इच्छुक असताना उमेदवारी मात्र भाजपतील बळीराम सिरस्कार यांना दिली. बळीराम सिरस्कार यांनी बाळापूर मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. २००९ मध्ये ते भारिप-बमसं समर्थित अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये सलग दुसऱ्यांदा भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर विधानसभा गाठली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने त्यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्या ठिकाणी पराभव झाल्यानंतर बाळापूर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. बळीराम सिरस्कार यांनी वंचितला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतला. ते बाळापूरमधून लढण्यासाठी इच्छुक असतानाच या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला. आज शिवसेना शिंदे गटाकडून सिरस्कार यांना उमेदवारी मिळाली. आता बाळापूरमध्ये दोन्ही शिवसेना व वंचित आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Maharashtra assembly election 2024 BJP releases third list of 25 candidates
BJP 3rd Candidate List: भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
Congress Candidates List
Congress Candidates List : मविआच्या जागा वाटपात काँग्रेस शंभरी पार, सम-समान फॉर्म्युल्यावर प्रश्नचिन्ह!
Maharashtra vidhan sabha
उमेदवारी अर्जांसाठी अखेरचे दोन दिवस; महायुती, मविआतील घोळ मात्र अद्याप कायम

हेही वाचा : भाजपच्या दिवंगत आमदाराचे पुत्र राष्ट्रवादीचे उमेदवार; कारंज्यात नाट्यमय घडामोडी

वाशीम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघात शिवसेनेने विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी यांना उमेदवारी दिली. लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे राजकीय पुनर्वसन करून विधान परिषदेवर घेण्यात आले. तरीही त्या रिसोडमधून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक राहिल्या. शिंदे गटाने त्यांनाच रिसोड मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

Story img Loader