अकोला : अकोला जिल्हा परिषदमध्ये अनेक वर्षांपासून वंचित आघाडीची सत्ता असतांना मागासवर्गीयांचा निधी परत जातो. त्यांचा कर्मावर विश्वास नसल्याने दु:खद प्रसंगी देखील ते राजकारणच करतात. अशा तत्त्वांनी भाजपला शहाणपण शिकवण्याची गरज नाही, असे प्रत्युत्तर भाजप जिल्हा प्रवक्ता गिरीश जोशी यांनी दिले. डाबकी रोड मार्गावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण शनिवारी भाजपच्यावतीने करण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन होऊन आठ दिवसांचा कालावधी देखील झाला नसतांना उड्डाणपुलाचे लोकार्पण केल्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी भाजपवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “वयाने मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत ‘असे’ बोलू नये”, प्रफुल्ल पटेल यांचा रोहित पवार यांना सल्ला

भाजपने असंवेदनशीलतेचा कळस गाठल्याचा आरोप त्यांनी केला. यावर भाजपने पलटवार केला. आमदार गोवर्धन शर्मा यांनी धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये पाच दशके कार्य केले. सर्व घटनाकांना न्याय देऊन प्रत्येकाच्या सुख-दु:खात सहभागी होत कार्य करण्यावर त्यांचा विश्वास होता. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आ.शर्मा हे पितृतुल्य व आदर्श व्यक्तिमत्त्व आहे, असे मत गिरीश जोशी यांनी व्यक्त केले. राजकीय अस्तित्व संपणाऱ्यांनी केवळ चांगल्या कामांना विरोध करणे हे एकमेव सुरू केले. जिल्हा परिषदमध्ये वंचित आघाडीची सत्ता असतांना मागासवर्गीयांचा निधी परत जातो. त्यांचा कर्मावर विश्वास नाही. ते प्रत्येक गोष्टीत राजकारण करीत असतात. अशा तत्वांनी भाजपाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. आमदार शर्मा व भाजप हे वेगवेगळे होऊ शकत नाहीत, अशा शब्दात गिरीश जोशी यांनी वंचित आघाडीवर निशाना साधला.

हेही वाचा : कुख्यात गुंड अरुण गवळी आणखी चार आठवडे मुक्त…

आमदार शर्मा यांनी आपल्या शेवटच्या दिवसापर्यंत विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रम कार्यकर्त्यांच्या हस्ते करून घेतले व पीडित वंचितांना मदतीचा हात देण्याचे कार्य त्यांनी शेवटपर्यंत सुरू ठेवले. त्यांच्या निधनानंतर भाजप कार्यकर्ता व परिवाराची भावना दुखवण्याचा प्रकार करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवणार आहे. भाजप विरोधकांनी या विषयाचे राजकारण करू नये, असे गिरीश जोशी म्हणाले.