अकोला : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून खोटा प्रचार करण्यात आला. भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलण्याविषय गैरसमज पसरवण्यात आले, असा आरोप माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार डॉ. भागवत कराड यांनी आज येथे केला. संविधान कोणीही बदलू शकत नाही, असा दावादेखील त्यांनी केला.

अकोला लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, माजी महापौर विजय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे, महानगराध्यक्ष जयंत मसने, प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी आदी उपस्थित होते. भाजपकडून राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये आढावा घेतला जात आहे. निवडणुकीतील कामगिरीवर चिंतन करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली. त्याचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे सादर करणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

हेही वाचा : ‘हिट अँड रन’ मध्ये जखमी ‘त्या’ चिमुकलीचाही मृत्यू

गेल्या १० वर्षांत देशाचा झपाट्याने विकास झाला. सर्वच क्षेत्रात देशाने प्रगती केली. जर्मनी, जपानला मागे टाकून देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या स्थानावर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न आहेत. ते आगामी काळात त्यामध्ये निश्चित यशस्वी होतील, असा विश्वास डॉ. कराड यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने खोटा प्रचार केला. भाजप पूर्ण बहुमतात सत्तेत आल्यास संविधान बदलतील, असा गैरसमज मतदारांमध्ये काँग्रेसने पसरवला. काही नागरिकांमध्ये तसा समज देखील झाला होता. खोटारड्या प्रचाराला ते बळी पडले. २०१४ मध्ये मोदींनी संविधानाला वंदन करून शपथ घेतली होती. यावेळेस देखील त्यांनी संविधानाला साक्षी ठेऊन पदभार स्वीकारला. संविधान कोणीही बदलणार नाही, असे डॉ. कराड यांनी सांगितले.

हेही वाचा : ईव्हीएमबाबत शंका निरसन करण्याचा सर्वांना अधिकार – बावनकुळे

काँग्रेसने प्रचारात प्रचंड खोटी आश्वासने देऊन मतदारांची दिशाभूल केली. प्रत्येक महिलांच्या खात्यात ८,५०० रुपये जमा करण्याचे आमिष दाखवले. काँग्रेसने ‘गरिबी हटाव’चा नारा दिला होता, मात्र त्यांच्या कार्यकाळात कधीही गरिबी हटली नाही, अशी टीकादेखील डॉ. कराड यांनी केली. भाजपने संपूर्ण अभ्यास करून जाहीरनामा तयार केला होता. त्या जाहिरनाम्यातील आश्वासने पाळली जाणार आहेत. आगामी काळात देशात उज्ज्वल काळ येणार आहे, असा दावाही कराड यांनी केला.

हेही वाचा : आनंदाची बातमी! तब्बल दोन आठवड्यानंतर मोसमी पाऊस पुढे सरकला…

आगामी निवडणुकांसाठी तयार रहा

आगामी विधानसभा, महापालिका, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या संपर्कात रहा. निवडणुकांच्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन कराड यांनी केले. आढावा बैठकीत त्यांनी १६५ पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली.

Story img Loader